बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे क्रेझ पाहायला मिळत आहे. कोणी शाहरुखचा चित्रपटातील हुबेहुब लूक करत आहेत, तर कोणी चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘जवान’ चित्रपटातील गाणी ट्रेंडिंगला आहेत. त्यामुळे कलाकार मंडळी देखील या गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘देवाला आवडणारा आवाज’; उत्कर्ष शिंदेने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दुर्मिळ व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा, म्हणाला…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरबरोबर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत पृथ्वीकनं मजेशीर कॅप्शन लिहीलं आहे की, “उत्स्फूर्त ‘चलेया’ कात्रजच्या नयनताराबरोबर.” पृथ्वीक आणि प्रियदर्शनीचा हा डान्स व्हिडीओ शिवाली परबनं शूट केला आहे.

हेही वाचा – “स्वामींची शक्ती विलक्षण आहे”; अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव, म्हणाली, “ज्यांना आयुष्यात…”

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहते भरभरून कमेंट करत आहेत. पृथ्वीकनं प्रिदर्शनीला कात्रजची नयनतारा बोलल्यामुळे तिनं देखील कमेंटमध्ये विक्रोलीचा शाहरुख खान त्याला म्हटलं आहे. अभिनेता प्रथमेश शिवलकरने लिहीलं आहे की, “उत्स्फूर्तपणे लिहीलंय पण हे चार दिवस या व्हिडीओसाठी रिहर्सल करत होते. माझ्याकडे याचे व्हिडीओ आहेत.” तसेच समीर चौघुले यांनी देखील कमेंट केली आहे. त्यांनी लिहीलं आहे की, “मी आधीच म्हणत होतो माझ्या शिवाय करा हे रील..पण नाही”

हेही वाचा – “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…

दरम्यान, यापूर्वी पृथ्वीकने ‘जवान’ चित्रपटातील शाहरुखच्या टक्कल लूक हुबेहुब केला होता. तसेच शाहरुखप्रमाणे या लूकमध्ये ‘बेकरार करके हमे..’ गाण्यावर पृथ्वीकने डान्स देखील केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Story img Loader