अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाने त्याला वेगळी ओळख दिली. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. तर आता नुकतंच त्याने त्याची सेलिब्रिटी क्रश कोण याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा : “मुग्धा-प्रथमेशचंही ठरलं, तू कधी लग्न करणार?” अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
अभिनेता पृथ्वीक प्रताप चाहतावर्ग मोठा आहे. पृथ्वीकही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याचे चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडिया वरून मुलाखतींमधून तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, त्याला आलेले अनुभव मोकळेपणाने चाहत्यांशी शेअर करत असतो. तर आता त्याने त्याच्या आयुष्यातील काही गुपितं उघड केली आहेत.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याची पहिली सेलिब्रिटी क्रश कोण होती हे सांगितलं आहे. तो म्हणाला, “ते दोन वयोगटांमध्ये आहे. आर्या आंबेकर माझी क्रश आहे. जशी मला आर्या आवडते तशीच मला क्रश म्हणून गौरी नलावडेही आवडते. फक्त क्रश.. याचा दुसरा कोणतंही अर्थ काढू नका.” तर आता पृथ्वीकच्या या बोलण्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.