Prithvik Pratap Prajakta Vaikul Wedding Unseen Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी लग्नगाठ बांधली. पृथ्वीक व प्राजक्ता यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबरला) अत्यंत साधेपणाने निसर्गाच्या सानिध्यात लग्न केलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आता पृथ्वीकने लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर लग्नातील इतर तीन फोटो शेअर केले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी सुंदर फोटोशूट केलं आहे. “झाड मातीच्या सलोख्या इतकं, घट्ट नातं जुळावं,
बहरावी प्राजक्ता हर जन्मी अन् वसुंधरेस मी मिळावं!” असं कॅप्शन पृथ्वीकने या फोटोंना दिलं आहे.
हेही वाचा – “मुलाचं लग्न आज पार पडलं”, पृथ्वीक प्रतापसाठी भावाची खास पोस्ट; म्हणाला, “तुझा आणि प्राजक्ताचा…”
पृथ्वीक व प्राजक्ता यांनी फार खर्च न करता साधेपणाने लग्न केलं. दोघांनी लग्नात अवाढव्य खर्च करणं टाळलं. लग्नाचा सगळा खर्च या जोडप्याने सामाजिक कारणासाठी वापरायचं ठरवलं. प्राजक्ता व पृथ्वीकने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली. ते लग्नाचा खर्च हा या मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहेत. कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं. हेच लग्नाचं बेस्ट गिफ्ट आहे, असं पृथ्वीक त्याच्या या निर्णयाबद्दल म्हणाला.
पाहा फोटो –
आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे अस आम्हाला वाटतं”, असं पृथ्वीक म्हणाला.
पृथ्वीक व प्राजक्ता दोघेही मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पृथ्वीकने लग्नाची बातमी दिल्यानंतर त्याचे व प्राजक्ताचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत. प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीकने तिच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले होते.
हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान, पृथ्वीक प्रतापने लग्नाची बातमी दिल्यावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. अमृता खानविलकर, सायली संजीव, अभिजीत खांडकेकर, प्रसाद खांडेकर यांच्यासह अनेकांनी प्राजक्ता व पृथ्वीकचं अभिनंदन केलं आहे.