प्रियदर्शिनी इंदलकर(Priyadarshini Indalkar) ही अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. तिच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसते. नुकतीच ती ‘रुखवत’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता एका मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्राकडे वळताना पालकांचा पाठिंबा होता का यावर वक्तव्य केले आहे. तसेच, अभिनय क्षेत्रातील स्पर्धेबाबतही तिने मत मांडले आहे.

प्रियदर्शिनी इंदलकर काय म्हणाली?

k

Maharashtrachi Hasyajatra Fame Priyadarshini Indalkar shared special post for arti more
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने ‘या’ अभिनेत्रीसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “एकत्र राहायला लागल्यापासून…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
geologist Gajanan Rajaram Udas information in marathi
कुतूहल : आण्विक खनिजे शोधणारा भूवैज्ञानिक
pune crime news in marathi
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
baba amte loksatta news
वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी…
ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
Cattle Slaughter Bhandara, Cattle , Marriage ,
भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह

k

प्रियदर्शिनी इंदलकरने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, इंजिनियरिंग केल्यानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळी घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, त्यांचा पाठिंबा होता का, अशा आशयाचा प्रश्न प्रियदर्शिनी इंदलकरला विचारण्यात आला. त्यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “घरातून पाठिंबा होता, असं म्हणता येणार नाही आणि नव्हता, असंही म्हणता येणार नाही. माझे घरचे खूप प्रॅक्टिकल आहेत. विशेषत: माझे बाबा प्रॅक्टिकल विचार करणारे आहेत. मीसुद्धा तशीच आहे. माझं स्वप्न साकार होईल, मी खूप मोठी अभिनेत्री होईन वगैरे ही स्वप्नं बघणं ठीक आहे. पण, हे जर नाही झालं, तर आयुष्य नैराश्यानं खाल्लं नाही पाहिजे. आपल्याकडे काहीतरी प्लॅन बी पाहिजे, असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. आपल्याला जगण्यासाठी बेसिक नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय चालू राहिला पाहिजे आणि मग आपली स्वप्न वगैरे ते आलंच. त्यांचं तेच म्हणणं होतं की, तुझं इथे काहीच झालं नाही. तुला काही काम मिळालं नाही, तर तुझ्याकडे नोकरी मिळण्यासाठी काहीतरी टेक्निकल डिग्री पाहिजे. तर म्हणाले, इंजिनियरिंग कर. कारण- ते व आई दोघेही इंजिनीअर आहेत. त्या डिग्रीने कुठे तरी काहीतरी नोकरी मिळून जाईल. म्हणून इंजिनियरिंग केलं. व्यवस्थित फर्स्ट क्लास विथ डिस्टिंग्शनची माझ्याकडे डिग्री आहे. ती डिग्री पूर्ण झाल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की, आता मला हवं ते करू द्या. मग मी कामं शोधणं सुरू केलं.

अभिनय क्षेत्रातील स्पर्धेविषयी बोलताना प्रियदर्शिनीने म्हटले, “मला बऱ्याचदा रेस, असा विचार आला की, खूप दडपण येतं. आपण त्या रेसमध्ये आहोत का? आपण कुठल्या स्थानावर आहोत? पुढे कसं जायचं? आपण मागे पडत चाललोय का वगैरे प्रश्न पडतात. पण, त्याच वेळी हे सगळे क्षुल्लक विचार वाटतात. म्हणजे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहणं, हेच तुमच्या हातात आहे. बाकी हे रेस या गोष्टींमध्ये अडकल्यानंतर आपलं काम मागे पडत जातं. खूप नकारात्मक विचार आपल्याला खायला लागतात. त्यामुळे असा एक विचार येण्याचा काळ होता की, माझ्याकडे अमुक अमुक गोष्ट नाहीये. माझ्याकडे अशा पद्धतीचं अभिनय करण्याचं कौशल्य नाहीये. पण, स्वत:बद्दल असुरक्षितता तयार करण्याची काहीच गरज नसते. असा काळ होता की, मी असा विचार करत होते. त्यावर माझं मलाच उत्तर सापडलं की, आपल्याकडे जे आहे, ते वाटण्याचा प्रयत्न करायचा आणि समोरच्याचं जे प्रेरित, आकर्षित करतं, ते घेण्याचा प्रयत्न करायचा. तिथे स्पर्धा संपून जाते. तुम्ही एकमेकांकडून प्रेरणा घेत राहता. मला मनापासून एकमेकांचं कौतुक करता यावं आणि त्याला स्पर्धा म्हणून न बघता, त्याला प्रेरणा म्हणून बघावं. सगळ्यांची आयुष्यं खूप सोपी होतील, मूळात स्वत:चं आयुष्य सोपं होईल”, असे म्हणत प्रियदर्शिनीने तिचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याचा ८ वर्षांनी झाला घटस्फोट; अभिनेत्रींच्या वकिलांनी दिली माहिती म्हणाले, “तिने आणि तिच्या मुलांनी…”

प्रियदर्शिनी इंदलकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.

Story img Loader