scorecardresearch

Premium

Video: “आलिया, परिणीतीपेक्षाही छान…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा सुंदर आवाज ऐका…

maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा सुंदर आवाज ऐका…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि या कार्यक्रमामधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. हास्यजत्रेमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता हेच कलाकार नवनवीन चित्रपटातून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गौरव मोरे, निखिल बने यांचे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. तसेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरची वेब सीरिज ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रियदर्शनी इंदलकर ‘शांतीत क्रांती २’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये ललित प्रभाकर, अभय महाजन, अलोक राजवडे मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी हे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. येत्या १३ ऑक्टोबर ‘सोनी लिव्ह’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. याच वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान प्रियदर्शनीनं एक गाणं गायलं होतं. त्याच्या व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
priya bapat shared romantic photo
“सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं…” प्रिया बापटने शेअर नवऱ्याला किस करतानाचा फोटो, नेटकरी म्हणाले…
Actor Akhil Mishra Wife Suzanne Bernert
पत्नी घरी नसताना झाला अखिल मिश्रांचा अपघात, सुझानला धक्क्यातून सावरता येईना; प्रतिक्रिया देत म्हणाली…
Surabhi Bhave
“गणपती बाप्पासमोर ‘आला बाबुराव’ हे गाणं ऐकलं आणि…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

हेही वाचा – “कुणी बोलायचं नाही” मराठमोळ्या संगीतकाराच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला, “दारू पिऊन वर्षभरातील सर्व भावना…”

‘शांतीत क्रांतीच्या शूट दरम्यान एकांतात…’ असं लिहीत प्रियदर्शनीनं गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटातील ‘यूही’ हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. प्रियदर्शनीच्या आवाजाचं कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?

“व्वा”, “आलिया परिणीतीपेक्षाही तू छान गाणं गायली आहेस”, “छान, आवाजाला वजन आहे”, “अप्रतिम”, “चांगलं जमतंय की”, “अजून तुला रियाज करायची गरज आहे”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रियदर्शनीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

दरम्यान, प्रियदर्शनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा काही महिन्यांपूर्वी ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेता सुबोध भावेबरोबर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. तसेच ती शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ वेब सीरिजमध्येही झळकली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar sing yun hi song pps

First published on: 30-09-2023 at 09:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×