"...घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी", शिवाली परबचा व्हिडीओ चर्चेत | maharashtrachi hasyajatra fame shivali parab video goes viral | Loksatta

“…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवाली परबचा व्हिडीओ चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

shivali parab video
शिवाली परबचा व्हिडीओ. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री शिवाली परबही याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचली.

हास्यजत्रेमुळे शिवालीच्या चाहत्या वर्गात दिवसेंदिवस भर पडत आहे. शिवाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबद्दल शिवाली तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. तसंच अनेकदा ती फोटो व व्हिडीओही शेअर करताना दिसते. शिवालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> “Investment चुकली की…”, कुशल बद्रिकेने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

शिवालीने हास्यजत्रेच्या टीमबरोबर एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये ती “किती दिवस बनून राहू तुझी मी पाहुणी, घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, असं व्हिडीओत ती म्हणत आहे. त्यानंतर सगळे ओरडत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. सोनी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिवालीच्या या मजेशीर व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेली सुहानी शाह कोण आहे? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो

हेही वाचा>> प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…

शिवाली एक उत्तम अभिनेत्री आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवालीने चित्रपटांतही काम केलं आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिने दिलेल्या किसींग सीनचीही चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:42 IST
Next Story
“Investment चुकली की…”, कुशल बद्रिकेने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत