Video: मंगलाष्टका संपताच वनिता खरातला उचलून घेतलं अन्...; लग्नातील व्हिडीओ व्हायरल |maharashtrachi hasyajatra fame vanita kharat and sumit londhe wedding video goes viral | Loksatta

Video: मंगलाष्टकं संपताच वनिता खरातला उचलून घेतलं अन्…; लग्नातील व्हिडीओ व्हायरल

Vanita Kharat Wedding: वनिता खरात-सुमित लोंढेच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

vanita kharat wedding video
वनिता खरातच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी २ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला.

वनिता व सुमितच्या लग्नसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये वनिता व सुमितच्या लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. फिल्मीवाला या इन्स्टाग्राम पेजवरुन वनिता व सुमितच्या लग्नातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> महेंद्रसिंग धोनीचा खाकी वर्दीतील फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले “सिंघम ३ मध्ये…”

वनिता व सुमितच्या लग्नात मंगलाष्टक झाल्यानंतर एकमेकांना हार घालण्यासाठी त्यांना उचलून घेतल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर एकमेकांना हार घातल्यानंतर लग्नातील वऱ्हाडी मंडळींची धामधुम पाहायला मिळत आहे. लग्नातील या खास क्षणाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता. फेटा बांधल्यामुळे सुमित राजबिंडा दिसत होता. वनिता व सुमितला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:22 IST
Next Story
Video : वनिता खरातच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ कलाकारांचा खास डान्स, ‘दिलबरो’ गाणं लागताच डोळ्यात तरळले पाणी