‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम जितका चर्चेत असतो, तितकेच त्यातील कलाकार मंडळींही चर्चेत असतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील प्रत्येक कलाकाराचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री वनिता खरात.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात आता हिंदी चित्रपट, वेब सीरिज, जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीचा सध्या एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा – लोकप्रिय मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचे २६व्या वर्षी निधन, वाढदिवशीच झाला अपघात; मनवा नाईक भावुक पोस्ट करत म्हणाली…

वनिता खरातने हा डान्स व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “कोळीवाड्यातला सामे”, असं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये वनिता लोकप्रिय इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकरांबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघींनी सध्या ट्रेंड होतं असलेलं ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील ‘अंगारो’ गाण्यावर डान्स केला आहे.

व्हिडीओमध्ये वनिता निळ्या रंगाची लाल किनार असलेल्या सुंदर पैठणीत दिसत आहे. तर नलिनी मुंबईकर गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहेत. दोघींचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘मुंज्या’ चित्रपटाची १०० कोटींकडे घोडदौड; १६ दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हेही वाचा – Video: जुई गडकरीनं काकांबरोबर गायलं किशोर कुमार व आशा भोसलेंचं लोकप्रिय गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

वनिता व नलिनी मुंबईकरांच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “वनी साडीत छान दिसते”, “किती गोड डान्स…वनिता खूप छान दिसत आहेस”, “नादखुळा”, “कडक वनी”, “मस्त डान्स”, “वनिता खरात कोळीणबाय दिसतेय”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, वनिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व्यतिरिक्त नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत ती पाहायला मिळाली होती.