'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधणार आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा विवाहसोहळा पार पडणार आहे. वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिता व सुमितचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. हळदीसाठी वनिता व सुमितने खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही वनिता व सुमितच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कालच वनिताच्या मेहेंदी कार्यक्रम पार पडला. मेहेंदी सोहळ्यानंतर आता वनिता व सुमितच्या हळदी समारंभातील फोटो व्हायरल होत आहेत. हेही वाचा>> स्वत:च्याच हळदीत बेभान होऊन नाचली वनिता खरात, फोटो व्हायरल हेही वाचा>> “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग वनिताचा होणारा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. वनिताने सुमितच्या वाढदिवशी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. अनेकदा वनिता व सुमित एकमेकांबरोबर फोटो शेअर करताना दिसतात. हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी वनिता व सुमित एका पिकनिकमध्ये एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.