‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली विवाहबंधनात, पहिला फोटो समोर |maharashtrachi hasyajatra fame vanita kharat tied knot with sumit londhe see photo | Loksatta

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली विवाहबंधनात, पहिला फोटो समोर

Vanita Kharat Wedding: शुभमंगल सावधान! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली विवाहबंधनात

vanita kharat wedding
वनिता खरात अडकली विवाहबंधनात. (Photo: ananda creation)

अभिनेत्री वनिता खरात विवाहबंधनात अडकली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला.

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली होती. पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य खुलून आलं होतं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता. फेटा बांधल्यामुळे सुमित राजबिंडा दिसत होता. वनिता व सुमितच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

हेही वाचा>> Video: वनिता खरात-सुमित लोंढेचा हळदी कार्यक्रमात भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

वनिता व सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे मेहेंदी व हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. वनिता व सुमितने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सेलिब्रिटी व चाहत्यांनी वनिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

वनिताचा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:29 IST
Next Story
आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने कुराणवर हात ठेवून…”