वनिता खरातची लगीन घटिका समीप; अभिनेत्रीने शेअर केला हिरवा चुडा भरलेला फोटो |maharashtrachi hasyajatra fame vanita kharat wedding rituals begins | Loksatta

वनिता खरातची लगीन घटिका समीप; अभिनेत्रीने शेअर केला हिरवा चुडा भरलेला फोटो

वनिता खरातची लगीनघाई, मेहेंदी सोहळ्यानंतर चुडा भरलेला फोटो व्हायरल

vanita kharat news
वनिता खरातची लगीनघाई. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात विवाहबंधनात अडकणार आहे. २ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह वनिता लग्नगाठ बांधणार आहे. वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी(३१ जानेवारी) वनिताच्या मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.

आता वनिताने हिरवा चुडा भरलेल्या हाताचा फोटो शेअर केला आहे. हिरव्या चुड्यामध्ये नववधूचा हात सजलेला दिसत आहे. वनिताला प्राजक्ता माळीने लग्नासाठी खास दागिने भेट म्हणून दिले आहेत. वनिताने हिरव्या चुड्यांमध्ये प्राजक्ताने भेट म्हणून दिलेल्या मोत्याच्या व पारंपरिक बांगड्या घातल्या आहेत.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लगीनघाई! मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल

हेही वाचा>> आसाराम बापूच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली “या माणसाला…”

वनिताच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत वनिता व सुमिता विवाहबंधनात अडकणार आहेत. वनिताच्या मेहेंदी कार्यक्रमाला हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा>> शिव ठाकरेला आमदार बच्चू कडूंचा पाठिंबा; ‘बिग बॉस’ स्टारचा पान टपरीवरील ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिता ‘सरला एक कोटी’ चित्रपटातही झळकली होती. वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:24 IST
Next Story
Video: आधी टॉवेल गुंडाळून कॅमेऱ्यासमोर केला डान्स अन् मग… श्रद्धा आर्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल