Vanita Kharat shares video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी शो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्यामध्ये नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, समीर चौगुले, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, ईशा डे असे अनेक कलाकार या शोमध्ये आहेत.
या शोमधील प्रत्येक कलाकाराचा चाहतावर्ग आहे. त्यांच्या विनोदाचे टायमिंग, डायलॉग म्हणण्याची पद्धत आणि प्रेक्षकांना हसायला लावण्याचे कौशल्य या सगळ्यामुळे या शोचा मोठा चाहतावर्ग आहे.
“प्रेमात पडणं जास्त सोपं आहे”
कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोबरोबरच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. हे कलाकार सोशल मीडियावर विविध पोस्ट, फोटो, व्हिडीओ शेअर करतात. या माध्यमातून ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यातील गोष्टींबद्दल सांगत असतात. तसेच, त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दलही ते सांगतात. चाहत्यांबरोबर काही खास गोष्टी शेअर करतात.
अभिनेत्री वनिता खरात काही महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यायाम करतानाचे काही फोटो ती शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यायाम करीत असताना खाली पडते. हा व्हिडीओ शेअर करताना तिने मजेशीर कॅप्शन लिहिली आहे. तिने लिहिले, “यापेक्षा प्रेमात पडणं जास्त सोपं आहे.”
वनिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिला व्यायाम करीत राहा, असेही सांगितले आहे. एकाने लिहिले, “कीप इट अप”, दुसऱ्या एकाने लिहिले, “आज तुला हे जमलं नाही, पण, एक दिवस नक्की जमेल”, आणखी एकाने लिहिले, “चांगला प्रयत्न केलास; पण एक दिवस तुला नक्की जमेल. ऑल द बेस्ट”, एकाने लिहिले, वर्कआऊटच्या प्रेमात पडणं जास्त सोप आहे”, एकाने लिहिले, “तू करू शकतेस”, आणखी एकाने लिहिले, “खूप छान प्रयत्न. तू आयुष्यात खूप मेहनत करून खूप काही साध्य केले आहेस. हे तुझ्यासाठी नक्कीच शक्य आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझ्या सातत्याचे आणि आत्मविश्वासाचे मला कौतुक वाटते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


दरम्यान, वनिता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिचा वाढदिवस झाला. तिचा वाढदिवस तिने ताज हॉटेलमध्ये साजरा केला. वनिताने वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
