विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून विनोदी स्किट करत त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. त्यांच्या जाडेपणावर अनेकदा विनोद केला जातो, नेटकरीही त्यांच्या पोस्ट्सवर त्यावरून कमेंट्स करत असतात. पण त्यांच्या जाडेपणामुळे त्यांच्या हातून अनेक भूमिका गेल्या असं त्या म्हणाल्या आहेत. आणखी वाचा : आई-वडिलांचा लग्नाला विरोध, तर आजी…; ‘अशी’ आहे विशाखा सुभेदार यांची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाल्या, “घरात कोंडून…” नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल भाष्य करताना त्या म्हणाल्या, "माझ्या जाडेपणामुळे जर माझ्या वाट्याला एखादी भूमिका आली नाही तर मला त्याचं वाईट वाटतं. अनेकदा मला वाटतं की ही भूमिका मला चांगली करता आली असती पण माझी फिगर त्यासारखी नाही. पण तशी जर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत. त्यामुळे मला या सगळ्या मुलींचं खूप कौतुक वाटतं." हेही वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये फटकारलं, टोमणे खावे लागले…” विशाखा सुभेदार यांनी सांगितलं कार्यक्रम सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या, “स्किट झाल्यानंतर…” पुढे त्या म्हणाल्या, "सईपासून अमृतापर्यंत या सगळ्या अभिनेत्री स्वतःला तसं ठेवतात. कधी बारीक होतात, तर कधी वजन वाढवतात. प्रियाही त्यापैकीच एक आहे. त्यामुळे या सगळ्या मुली खरंच कौतुकास पात्र आहेत. कारण सतत स्वतःच्या शरीरावर सातत्याने काम करत राहणं म्हणजे मस्करी नाही. तर ते मला जमत नाही आणि हे माझं अपयश आहे, असं मला वाटतं. याची कधीकधी खंतही वाटते. पण दुसरीकडे असंही वाटतं की माझ्या पद्धतीच्या भूमिका त्याही करू शकत नाहीत तसंच त्यांच्या पद्धतीच्या भूमिका मी करू शकत नाही. त्यामुळे माझ्या प्रकारच्या भूमिका मीच करू शकते असं मी स्वतःला सांगत असते." तर आता त्यांचे चाहते त्यांच्या या सकारात्मक वृत्तीचं कौतुक करत आहेत.