scorecardresearch

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांचा शिमला-मनालीमध्ये लेकीसह भन्नाट डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

अरुण कदम लेकीसह शिमला-मनाली ट्रीपला गेले होते. यावेळी त्यांनी मुलीबरोबर धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Sukanya Kadam Arun Kadam
अरुण कदम लेकीसह शिमला-मनाली ट्रीपला गेले होते. यावेळी त्यांनी मुलीबरोबर धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम म्हणजेच सगळ्यांचा लाडका दादूसवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अरुण कदम यांच्या विनोदी भूमिकांचे लाखो चाहते आहेत. कामामध्ये कितीही व्यग्र असले तरी अरुण आपल्या कुटुंबियांना अधिकाधिक वेळ देताना दिसतात. अलिकडेच ते आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर काश्मिर, मनाली, शिमला येथे गेले होते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओही त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

अरुण कदम यांचं लेक सुकन्यावर प्रचंड प्रेम आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लेकीबरोबरचे फोटो व्हिडीओ ते शेअर करताना दिसतात. त्यांचे लेकीबरोबरचे डान्स करतानाचे बरेच व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुटुंबाबरोबर अरुण यांनी त्यांचं व्हॅकेशन अगदी मनसोक्त एण्जॉय केलं.

यादरम्यान चक्क शिमल व मनालीमध्ये ते लेकीबरोबर डान्स करताना दिसले, याचदरम्यानचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते लेक सुकन्याबरोबर धमाल डान्स करत आहेत.

आणखी वाचा – Video : भर पार्टीत बायकोला नाचताना पाहून भारावला अमृता खानविलकरचा नवरा, अभिनेत्रीची आईही बघतच बसली अन्…

अरुण यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “माझी मुलगी सुकन्यासह शिमला व मनाली पिकनीक.” लेकीबरोबर डान्स करताना अरुण यांचा चेहऱ्यावर असलेला उत्साह खरंच पाहण्यासारखा आहे. त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 11:02 IST