‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यामध्ये तो यशस्वी ठरला. निखिल खऱ्या आयुष्यामध्येही अगदी साधा आणि उत्तम व्यक्तीमत्त्व असलेला कलाकार आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने त्याच्या चाळीमधील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सगळीकडेच उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात येत आहे. कलाकार मंडळीही दिवाळी साजरी करण्यामध्ये व्यग्र झाली आहेत. निखिलही आपल्या राहत्या चाळीमध्ये कुटुंबासह दिवाळी साजरी करत आहे. निखिल भांडूपमधील एका चाळीमध्ये राहतो. तेथीलच त्याने व्हिडीओ शेअर करत दिवाळीमध्ये चाळीत असणारं वातावरणं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ

निखिलने चाळीतील व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला, “सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शभेच्छा. आपली दिवाळी, चाळीतली दिवाळी.” निखिलने शेअर केलेल्या व्हि़ीओमध्ये चाळ संस्कृतीचं सुंदर दर्शन घडत आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ

तसेच हॅशटॅग चाळीतील दिवाळी असंही त्याने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. कंदील, रोषणाई, प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी असं चाळीतलं चित्र निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुला दिवाळीच्या शुभेच्छा, चाळीतल्या दिवाळीसारखा दुसरा आनंद कशातच नाही अशा अनेक कमेंट त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

Story img Loader