scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? लेकही दिसते फारच सुंदर

प्रभाकर मोरे यांचे कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही फोटो पाहिलेत का?

Actor Prabhakar More maharashtrachi hasyajatra
प्रभाकर मोरे यांचे कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही फोटो पाहिलेत का?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. शिवाय कार्यक्रमामधील अनेक कलाकार त्यांच्या विनोदी शैलीमुळे प्रकाश झोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रभाकर मंचावर सादर करत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं.

आणखी वाचा – Video : ….अन् प्रभाकर मोरेंसह ‘शालू’ गाण्यावर परदेशी मुलांनाही धरला ठेका, समीर चौघुले म्हणाले, “आमचा प्रभा…”

आपल्या या लाडक्या कलाकाराबाबत जाणून घेण्यास चाहत्यांना फार आवडतं. प्रभाकर त्यांच्या कामाबरोबरच कुटुंबालाही अधिकाधिक वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रभाकर यांनी कुटुंबाबरोबरचेही काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

प्रभाकर यांनी पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ मध्यंतरी शेअर केला होता. त्यांनी या व्हिडीओला सुंदर कॅप्शन दिलं होतं. ‘माझी शालू’ असं म्हणत त्यांनी पत्नीबरोबरचा सुंदर व्हिडीओ शेअर केला. त्यांच्या या व्हिडीओचं चाहत्यांनी कौतुकही केलं. तर त्यांनी लेकीबरोबरचेही काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केले आहेत.

प्रभाकर यांची मुलगीही अगदी गोड दिसते. प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 19:18 IST
ताज्या बातम्या