scorecardresearch

Premium

आधी दिली प्रेमाची कबुली आता बॉयफ्रेंडसह दिवाळी साजरी करतेय वनिता खरात, फोटो व्हायरल

अभिनेत्री वनिता खरात सध्या तिच्या बॉयफ्रेंडबरोबर दिवाळी साजरी करत आहे.

vanita kharat vanita kharat boyfriend
अभिनेत्री वनिता खरात सध्या तिच्या बॉयफ्रेंडबरोबर दिवाळी साजरी करत आहे.

अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं. कामामुळे चर्चेत असणारी वनिता आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आताही तिने दिवाळी साजरी करतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत आपण प्रेमात असल्याचं सांगितलं. सुमित लोंढे असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. खुलेपणाने आपलं प्रेम जगजाहिर केल्यानंतर वनिता आता सुमितबरोबर दिवाळी साजरी करताना दिसत आहे.

eisha-chopra-post
७० वर्षीय वृद्धाने ‘नीरजा’फेम अभिनेत्रीची काढली छेड; सोशल मीडिया पोस्टमधून धक्कादायक खुलासा
uorfi-javed
“मी घरात नग्नावस्थेत वावरते कारण…” मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेदचा मोठा खुलासा
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeekshaa Tawde
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम
marathi actress Nandita Patkar
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सुमितबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही पारंपरिक ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. तसेच या दोघांच्या जोडीला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे. वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सुमितकडे पाहून गोड हसताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : भांडूपच्या चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत वनिताने सगळ्यांना दिवाळीच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत. तर सुमितनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वनिताबरोबरचा सुंदर फोटो शेअर केला आहे. परफेक्ट जोडी, सुंदर फोटो अशा अनेक कमेंट वनिताच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actress vanita kharat celebrate diwali with boyfriend share romantic photo see details kmd

First published on: 25-10-2022 at 11:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×