scorecardresearch

Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

vanita kharat home vanita kharat
Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता खरात नावारुपाला आली. वनिताने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह विवाहबंधनात अडकली. दोघंही सुखी संसारामध्ये रमले आहेत. इतकंच नव्हे तर वनिताने सुमितसह एक नवी सुरुवात केली आहे. या दोघांनी मिळून एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या सासूबाईंना पाहिलंत का? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी यांना…”

वनिता या युट्यूब चॅनलद्वारे तिच्या कामाविषयी तसेच खासगी आयुष्याबाबत विविध माहिती देताना दिसणार आहे. आता तिने होळीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. वनिता व सुमित यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी होती. या दोघांनी होळी अगदी आनंदात साजरी केली. यादरम्यानचाच व्हिडीओ वनिताने तिच्या युट्यूब चॅनलद्वारे शेअर केला.

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

या व्हिडीओमध्ये वनिताच्या सासरच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. तिने पहिल्यांदाच व्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे. वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचं स्वयंपाकघर दिसत आहे. तसेच दोघांचं छोटसं वॉर्डरोबही आहे. स्वयंपाक घरही छोटं पण अगदी लक्षवेधी आहे. वनिताच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

वनिताचं तिच्या सासूबाईंशी अगदी घट्ट नातं आहे. व्हिडीओमध्येही ते दिसून येतं. वनिता तिच्या सासूबाईंना आई अशीच हाक मारते. वनिता म्हणाली, “या माझ्या सासूबाई आहेत. या नाही कारण मी यांना ही असं म्हणते. कारण सासूबाई म्हणजेच माझी आई आहे. मी हिला आईच म्हणते”. वनिताच्या या व्हिडीओला युट्यूबवर तीन हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 18:30 IST
ताज्या बातम्या