scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लग्नाची तारीख समोर, म्हणाली…

मला लग्नाची तयारी करण्यासाठी वेळच मिळत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लग्नाची तारीख समोर, म्हणाली…

वनिताने काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला होता. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दलची कबुली दिली होती. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. त्या दोघांनी दिवाळीचा सणही एकत्र साजरा केला होता. आता लवकरच वनिता ही सुमितबरोबर लग्न करणार आहे. वनिताची लगीन घाई सुरु झाली आहे. नुकतंच तिने तिच्या लग्नाची तारीखही सांगितली आहे.

नुकतंच वनिता खरातने सरला एक कोटी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने आणि ईशा केसकर हे दोघेही प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर तिने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ओंकार भोजनेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दल…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, चित्रपटाचे शूटींग आणि त्यात लग्न हे सर्व तू कसं मॅनेज करतेय? लग्नाची तयारी कशी सुरु आहे?’ असा प्रश्न वनिताने विचारला होता. त्यावर ती म्हणाली, “मला लग्नाची तयारी करण्यासाठी वेळच मिळत नाही. मी पोस्ट ऑफिस उघडं आहे, हास्यजत्रेचे शूट करतेय त्यातून जो वेळ मिळतोय तेव्हा मी लग्नाची तयारी करतेय.”

त्यावर तिला लग्नाची तारीख सांगायला तुला आवडेल का? असा प्रश्न विचारला असता तिने मला नक्कीच आवडेल, असे म्हटले. “महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सर्व स्किटमध्ये माझ्या लग्नाची तारीख जगजाहीर झाली आहे. येत्या २ फेब्रुवारी २०२३ ला मी लग्न करणार आहे”, असे वनिता खरातने म्हटले. सध्या तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. तिचं लग्न कुठे असणार, लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याबद्दल लवकरच ती माहिती देणार आहे.

आणखी वाचा : “हमको साथी मिल गया…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 13:12 IST

संबंधित बातम्या