मराठीतील नावाजलेल्या विनोदी कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. विशाखाच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे तर तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. शिवाय कामाबरोबरच सोशल मीडियाद्वारेही ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. विशाखा सोशल मीडियाद्वारे तिचे विविध डान्स व्हिडीओ शेअर करते. आताही तिने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
विशाखा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकासाठी ती परदेश दौऱ्यावर गेली होती. परदेश दौऱ्यावर असतानाही तिने सोशल मीडियाद्वारे अनेक रिल व्हिडीओ शेअर केले होते. आता आणखी एका गाण्यावर विशाखाने डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. ‘होले होले हो जाएगा प्यार’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे.




विशाखाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेणारे आहेत. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभावाचं कौतुक केलं आहे. पण एका युजरने विशाखाच्या या व्हिडीओवर एक भलतीच कमेंट केली. त्याच्या या कमेंटला तिने रिप्लाय करत थेट उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

“हे अति होत आहे” असं एका युजरने व्हिडीओ पाहून म्हटलं. यावर विशाखाने फक्त एका शब्दात उत्तर दिलं. ती म्हणाली, “ओके”. पण तिच्या चाहत्यांनी विशाखाच्या या व्हिडीओचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विशाखाने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘कुर्रर्र’ या नाटकात काम करत आहे.