‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचं नाव डोळ्यासमोर येतं. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. सासरच्या मंडळींकडून नम्रताला उत्तम साथ मिळतेच. पण त्याचबरोबरीने तिचे वडीलही तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. नम्रताने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त याबाबतच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नम्रताच्या वडिलांचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी मी माझ्या वडिलांची लाडकी आहे हे मला माहित आहे. ‘अस्तित्व’ नावाची माझी पहिली एकांकिका. वांगणीला ती स्पर्धा झाली होती. तेव्हा मी १६ वर्षांची होते. जाताना नाटकाच्या ग्रुप बरोबर गेले. पण येताना लेक रात्री एकटी कशी येणार? या काळजीमुळे माझे वडील मला न्यायला आले. आणि आलोच आहे तर काय करतेय लेक?, कसं करते? हेसुद्धा त्यांनी पाहिलं”.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

“तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी एकांकिका पाहिली. कौतुक झालेलं पाहिलं. मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा तेही पाहिलं. पण सगळ्यात मोठं बक्षीस मला त्यादिवशी पप्पांकडून मिळालं. ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी. माझ्याबद्दलचा अभिमान आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी. अजून काय हवं. मला आठवतंय त्याप्रमाणे “बाहुलीच हवी मला द्या मज आणुनी” या हट्टानंतर जर कुठला माझा हट्ट असेल तर तो म्हणजे “अभिनयच माझी कला घ्या तुम्ही जाणुनी” कारण पप्पांना हे क्षेत्र मान्य नव्हतं. त्यामागे त्यांची माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती”.

आणखी वाचा – Odisha Train Accident : “याला जबाबदार कोण?” ओडिशातील अपघातानंतर विवेक अग्निहोत्रींचा संताप, म्हणाले, “अतिशय लज्जास्पद…”

“माहितीतलं या क्षेत्रात कोणीच नव्हतं. पण फक्त विश्वासाच्या जोरावर त्यांनी मला पाठिंबा दिला. नंतर जेव्हा आम्ही कधी बाहेर पडायचो अगदी कुठेही डॉक्टरकडे वगैरे की त्यांना माझी सगळी कथा सांगायचे. कुठली मालिका, कुठला पुरस्कार सगळं जे मला आठवत नसे तेही सगळं सांगायचे. पण त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांचा उत्साह बघून मन भरून यायचं. माझे पप्पा जगात भारी आहेत. त्यांच्यावर माझं अतोनात प्रेम आहे”. वडिलांवरचं प्रेम व्यक्त करत नम्रताने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem namrata sambherao share emotional post on her father birthday see details kmd
First published on: 03-06-2023 at 17:06 IST