scorecardresearch

Video : जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा लेक डायबिटीजचा अर्थ सांगतो तेव्हा…; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

नम्रता संभेरावच्या मुलाचा व्हिडीओ पाहिलात का? सोशल मीडियावर व्हायरल

maharashtrachi hasya jatra namrata sambherao
नम्रता संभेरावच्या मुलाचा व्हिडीओ पाहिलात का? सोशल मीडियावर व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचं नाव चाहत्यांच्या तोंडी येतंच. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. याबाबत तिने काही मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच ती आता मराठी चित्रपटांसाठीही काम करते. पण आपल्या कामामधून वेळात वेळ काढत ती कुटुंबासाठीही तितकाच वेळ देते.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? लेकही दिसते फारच सुंदर

नम्रता मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. तिच्या लेकाच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तो या व्हिडीओमध्ये मधुमेहाचा अर्थ त्याच्या भाषेमध्ये सांगताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

नम्रताने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “रुद्राज लहान मुलांना सांगत आहे की, बाहेरचं खाऊ नका. फक्त डायबिटीजचा अर्थ त्याने काय लावला आहे हे कळालं नाही”. रुद्राजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बोबडं बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. बहुतेक डायबिटीजचा अर्थ दात पाडणे असावा अशी कमेंट स्पृहा जोशीने केली आहे. रुद्राज रॉक असं समीर चौघुले यांनी म्हटलं आहे. तर चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे. याआधीही नम्रताने रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 14:14 IST
ताज्या बातम्या