सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षक भरभरुन दाद देतात. प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवण्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी ठरला. शिवाय कार्यक्रमामधील कलाकारांनीही प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काही पात्र व कलाकार प्रचंड गाजतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. सध्या ते आपल्या गावी कोकणात गेले आहेत.
आणखी वाचा – “हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर
कोकणात शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रभाकर यांचंही कोकणामध्येच मुळ गाव आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत ते आपल्या गावी पोहोचले आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या गावच्या घरासमोर पालखी नाचवताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या आवाजामध्ये प्रभाकर पालखी नाचवत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यासारखा आहे. काही फोटोंमध्ये प्रभाकर यांची मुलगी त्यांना रंग लावताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्येही ते कोकणी भाषा सादर करतात. त्याला प्रेक्षकही भरभरुन दाद देतात.
आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

‘शालू’ या गाण्यावर प्रभाकर यांचा नाच तर अगदी लोकप्रिय आहे. कोकणी शैलीत विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. प्रभाकर यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अधिकाधिक पसंती मिळत आहे.