प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की कलाकारांना नव्या जोमाने काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. कलाक्षेत्रामधील एखादा पुरस्कार मिळणं या कलाकारांसाठी कामाची पोचपावती असते. असंच काहीसं आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर याच्याबाबतीत घडलं आहे. प्रसादने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आणखी वाचा - “ती मरणाच्या दारात होती आणि…” प्रसाद खांडेकरने सांगितलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार ढसाढसा रडले कारण… 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे प्रसाद. प्रसाद उत्तम लेखनही करतो. तसेच त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. आता त्याचा एका पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. याचबाबत त्याने पोस्ट शेअर करत सांगितलं. तसेच पुरस्कार स्वीकारतानाचे फोटोही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. आणखी वाचा - मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग प्रसाद म्हणाला, "जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्व नाट्यरसिकांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या रंगभूमी दिनी एक आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे. ती म्हणजे नुकताच मला 'विघ्नहर्ता प्रतिष्ठान' तर्फे 'नाट्यगौरव' पुरस्कार मला जाहीर झाला. अजून एक सुखावणारी गोष्ट ही की हा पुरस्कार माझ्यासह माझा भाऊ सुशील इनामदारलाही जाहीर झाला". आणखी वाचा - चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले… "विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. तसेच माझ्या नाटकावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मायबाप रसिकांना अभिवादन. रंगभूमी चिरायू होवो". प्रसादच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी आम्हाला तुमचा अभिमान आहे असं म्हणत कमेंट केल्या आहेत.