मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

प्रसाद खांडेकरने सांगितलेली ‘ती’ घटना, नेमकं काय घडलं होतं?

prasad khandekar prasad khandekar news
प्रसाद खांडेकरने सांगितलेली 'ती' घटना, नेमकं काय घडलं होतं?

अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळेच त्याच्या चाहत्यावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच प्रसाद आता मराठी चित्रपटांमध्येही रमला आहे. ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करत आहे. प्रसादने आजवर उत्तमोत्तम काम करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

प्रसादने कलाक्षेत्रामधील त्याच्या करिअरला नेमकी कशी सुरुवात केली? याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रसादच्या वडिलांना नाटकांची प्रचंड आवड होती. शिवाय प्रसाद त्याच्या वडिलांसह नाटक पाहण्यासाठी जायचा. तिथूनच त्याला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. शिवाय तो एक उत्तम क्रिकेटपटूही होता.

आणखी वाचा – दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट; ४५ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री शोधतेय तिसरा जोडीदार, एकटीच करते मुलांचा सांभाळ, म्हणाली, “कधीतरी…”

‘इसापनीती’ या युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रसाद म्हणाला होती की, “खरं तर मी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर १४साठी माझी निवड झाली होती. इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर सगळंच थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. कारण तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते”.

आणखी वाचा – “लोन, डाउन पेमेंट, खर्च अन्…” वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, म्हणाला, “भीती होती पण…”

“बाबांनाही नाटकाची आवड होती. माझ्या कुटुंबामधून कोणीही या क्षेत्रामध्ये नाही. पण या क्षेत्राबाबत मला आवड होती. कांदिवलीच्या ठाकुर महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेत होतो. या महाविद्यालयामध्ये एकांकीका वगैरे हा प्रकार काहीच नव्हता. ठाकुर महाविद्यालयामध्ये फार कमी मराठी मुलं होती. मग मीच १० ते १५ मुलं जमा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून मराठी कलामंच नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुप अंतर्गत मी एकांकीका करू लागलो. इथूनच माझ्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. ‘आम्ही पाचपुते’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं”.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 18:08 IST
Next Story
Video: पती तुरुंगात अन् राखीने ठेवला रमजानचा रोजा; व्हिडीओ पाहून नेटकरी ट्रोल करत म्हणाले “नवरात्री सुरू…”
Exit mobile version