छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनी लवकरच सुबोध भावेच्या ‘फुलराणी’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने प्रियदर्शनीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

प्रियदर्शनी सध्या एका भाड्याच्या घरामध्ये राहते. मुंबईमध्ये ती आता स्थायिक झाली आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या घराची गोष्ट सांगितली. प्रियदर्शनी म्हणाली, “गेल्या दिड वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहते. मी आणि अभिनेत्री आरती मोरे एकत्र राहतो. आधी आम्ही दोघीही वेगळ्या घरात राहत होतो. पण ते घर आमच्या घरमालकांनी काही कारणास्तव विकलं. त्यानंतर आरती व मी एक दुसरं घर भाड्याने घेतलं आहे. आरतीच्या रुपाने मला खूप चांगली जोडीदार मिळाली आहे. अजूनही आमच्यामध्ये कधीच भांडणं झाली नाहीत. आमचा अगदी सुखाचा संसार सुरु आहे (गंमतीने प्रियदर्शनी म्हणाली)”.

“‘आमच्या हिचं प्रकरण’ हे व्यावसायिक नाटक मी करत होते. याच नाटकादरम्यान मी मुंबईमध्ये येऊ लागले. या नाटकामध्ये भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर यांच्याही भूमिका होत्या. मी मुळची पुण्याची. त्यामुळे सलग शनिवार, रविवार जेव्हा नाटकाचे प्रयोग असायचे तेव्हा मी नंदिता किंवा भार्गवी ताईकडे राहायचे. भार्गवी ताईकडेच मी खूप वेळा राहिली आहे. तेच माझं मुंबईतलं पहिलं घर होतं. नाटकात ती माझी आई होती. खऱ्या आयुष्यातही ती मला आईसारखीच वागणूक द्यायची.”

आणखी वाचा –…तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…

पुढे प्रियदर्शनी म्हणाली, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये जेव्हा मी सहभाग घेतला तेव्हाही मी पुणे ते मुंबई प्रवास करायचे. तेव्हाही मुंबईमध्ये माझ्याकडे घर नव्हतं. जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची रिहर्सल असायची तेव्हा पहाटे मी पुण्यावरुन शिवनेरीने निघायचे. दोन रात्र कुठेतरी राहायचं आणि तिसऱ्या दिवशी शूट करुन पुन्हा पुण्याला निघायचं. आठवड्यातून एकदा तरी असं व्हायचं. मग शिवालीही तेव्हा कल्याणला राहत होती. वनिता खरातचंही वरळीमध्ये घर होतं. रिहर्सल उशीरापर्यंत असल्यामुळे प्रत्येकाला घरी पोहोचणं शक्य नव्हतं. मग आम्ही रात्री कोणाचं तरी घरी शोधायचं आणि तिथे रात्री राहायचो”.

आणखी वाचा – लिव्हइन रिलेशनशिप, विधी न करताच लग्न, एकत्र दारूही प्यायले अन्…; नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांच्या लग्नाची अजब गोष्ट

“लॉकडाऊननंतर वनिता कांदिवलीला राहायला आली होती. मग तेव्हा मी वनिताकडे राहायला लागले. त्यामुळे वनिता खरातचं घर हे माझं दुसरं घर होतं. शिवाली परब आणि मी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर ‘असं माहेर नको गं बाई’ ही माझी मालिका सुरु झाली. या मालिकेचं चित्रीकरण ठाण्यात होतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहिलो नाही. पण दोन महिने शिवाली आणि मी एकत्र राहिलो”. आज प्रियदर्शनी स्वतःच्या पायावर खंबीर उभी आहे.