‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. लहान वयोगटातील मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच हा कार्यक्रम आवडीने पाहतात. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमामध्ये काम करणारे कलाकारही प्रसिद्धीच्या झोतात आले. यामधीलच एक कलाकार म्हणजे समीर चौघुले. समीर यांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील समीर यांच्या पात्रांची अगदी लहान मुलंही नक्कल करताना दिसतात.
सोशल मीडियावरही समीर यांची क्रेझ पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ डिजिटल क्रिएटर सोनाली गुरव हिने तयार केला होता. या व्हिडीओमध्ये सोनालीसह तिची इतर टीम पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये सोनाली तिच्या मित्राला समीर यांची नक्कल करुन दाखवते. शिवाय कोणाची नक्कल करत आहे हे ओळखायला सांगते.
आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समीरही भारावून गेले. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “रसिकांचं प्रेम” म्हणत व्हिडीओ शेअर केला. यावर एका चाहत्याने कमेंट केली. “सर, हे रिल आहे. रिल आहे सर? नाही मला पडलेला हा प्रश्न आहे. हे लोक जितकं तुमचं मनोरंजन करतात, तितकं आम्हीही करतो. मग आम्ही मिमर लोकांनीसुद्धा डोकं लावून व्हिडीओ केला तर ते फक्त बघून मोकळं व्हायचं. आम्हालाच वाईट वाटतं. आमच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं वाटतं”.
चाहत्याच्या या कमेंटवर समीर यांनी रिप्लाय दिला. त्याची नाराजी समजत समीर म्हणाले, “मी शक्य होईल तितक्या सगळ्यांना रिप्लाय देत असतो. पण तुम्हाला रिप्लाय देणं माझ्याकडून राहून गेलं असेल तर माफ करा. मला डीएम (डायरेक्ट मॅसेज) करा”. समीर यांनी कोणतीच तक्रार न करता त्या चाहत्याची माफी मागितली. म्हणूनच आज एक उत्तम व्यक्ती म्हणूनही प्रेक्षक त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.