सध्या सगळीकडेच धुळवडीच्या सेलिब्रेशनची धूम पाहायला मिळत आहे. कलाक्षेत्रामधील मंडळी तर सोशल मीडियावर धुळवडीच्या सेलिब्रेशनचे विविध फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे. काही कलाकारांची लग्नानंतरची ही पहिली होळी व धुळवड आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचीही लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. तिने होळी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
आणखी वाचा – “हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर
२ फेब्रुवारीला वनिता व सुमित लग्नबंधनात अडकले. या दोघांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आता वनिता तिचं वैवाहिक आयुष्य एण्जॉय करताना दिसत आहे. होळी हा तिचा लग्नानंतरचा पहिलाच सण होता. वनितासह सुमितने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वनिता पहिल्या सणासाठी माहेरी गेली होती. चाळीमध्ये तिने होळी हा सण साजरा केला. यावेळी वनिताला पाहण्यासाठी चाळीतल्या मंडळींनी एकच गर्दी केली होती. तसेच तिने पती सुमितबरोबर फोटोही काढला. या फोटोमध्ये या दोघांच्या पाठीमागे चाळीतील मंडळींची गर्दी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…
शिवाय धुळवडीचाही या दोघांनी आनंद लुटला. दादर येथील शिवाजी पार्क येथे धुळवडीचं वनिता व सुमितने सेलिब्रेशन केलं. एकमेकांना रंग लावत त्यांनी सुंदर फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये सुमित वनिताला किस करताना दिसत आहे. तर वनिताच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे.