वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

वनिता खरात लवकरच विवाहबंधनात अडकणार, होणाऱ्या नवऱ्यानेही काढली हातावर मेहेंदी

vanita kharat wedding news vanita kharat
वनिता खरात लवकरच विवाहबंधनात अडकणार, होणाऱ्या नवऱ्यानेही काढली हातावर मेहेंदी

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यातही त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. यामधील बरेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. गेल्या काही दिवसांपासून वनिता तिच्या लग्नाबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं करायची काम अन्…”

वनिता बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह २ फ्रेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या हातावर सुमितच्या नावाची मेहेंदी रंगली असल्याचं दिसत आहे.

तर सुमितने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी हातावर मेहेंदी काढली. विशेष म्हणजे या मेहेंदी सोहळ्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवाली परब, चेतना भट्ट यांनी वनिताचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वनिता व सुमितने त्यांच्या लग्नासाठी खास हॅशटॅग तयार केला आहे. “#su’MEET’vani” असा खास हॅशटॅग या जोडप्याने त्यांच्या प्रत्येक फोटोखाली दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच वनिताने सुमितबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत प्रेमाची कबुली दिली. आता या दोघांची लगीनघाई सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 14:42 IST
Next Story
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले “अजित पवार, सुप्रिया सुळे…”
Exit mobile version