scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता दुबईत! परदेश दौऱ्याबाबत समीर चौघुले म्हणतात…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ची परेदश वारी, दुबईकरांना अनुभवता येणार हास्याची मैफिल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता दुबईत! परदेश दौऱ्याबाबत समीर चौघुले म्हणतात…
हास्यजत्रेच्या टीमची दुबईवारी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोनी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो.

हासजत्र्येतील विनोदवीर आता दुबईकरांना त्यांच्या विनोदाच्या झटक्याने हसवायला सज्ज झाले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील हास्यवीर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. दुबईत त्यांच्या विनोदाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. हास्यजत्रेच्या टीमचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

हेही वाचा>> ‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. १५ जानेवारी रोजी हास्यजत्रेचा लाइव्ह कार्यक्रम दुबईतील शेख रशिद ऑडोटोरियममध्ये सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. त्यामुळे हास्यजत्रेतील कलाकारांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी दुबईकरांना मिळणार आहे.

हेही वाचा>> ‘स्ट्रेंजर थिंग्स’ फेम नोआ श्नॅपने दिली समलैंगिक असल्याची कबुली, म्हणाला “मी गे आहे…”

हेही पाहा>> “चांगल्या स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलणकरचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य

समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत हास्यजत्रेच्या टीमचे अभिनंदन केलं आहे. हास्यजत्रेतील कलाकारांना लाइव्ह पाहण्यासाठी दुबईकरही आतुर आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या