scorecardresearch

गर्लफ्रेंडबद्दलचा प्रश्न विचारताच ओंकार भोजने लाजत म्हणाला, “मी…”

काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

गर्लफ्रेंडबद्दलचा प्रश्न विचारताच ओंकार भोजने लाजत म्हणाला, “मी…”
ओंकार भोजने

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित आहे. नुकतंच ओंकार भोजनेने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल भाष्य केले.

काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. ओंकार भोजने हा सध्या ‘सरला एक कोटी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने त्याने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या अपेक्षांबद्दल विचारणा करण्यात आली. त्याबरोबर त्याला तुझी गर्लफ्रेंड आहे का? असेही विचारण्यात आले.
आणखी वाचा : “मला हास्यजत्रेत…” ओंकार भोजनेने ‘फू बाई फू’ कार्यक्रमात जाण्याबद्दल दिले स्पष्टीकरण

त्यावर अभिनेत्री ईशा केसकरने ओंकारला काय काय आवडते? याबद्दल सांगितले. यावेळी ईशा म्हणाली, “ओंकारला फक्त आईस्क्रीम आणि दुधाचे पदार्थ आवडतात. त्याला गोड खायलाही आवडतं. छान स्वयंपाक करणारी एखादी मुलगी त्याला आवडेल. त्याचे आई बाबा चिपळूणला असतात. त्यामुळे त्यांना तुमच्या बाजूने वळवून घ्या. कारण त्याने आई-बाबा म्हणतील ती असं सांगितलं आहे.”

ईशाने दिलेल्या या उत्तरानंतर ओंकार भोजने म्हणाला, “माझं अजून तरी काहीही ठरलेलं नाही. माझी इतकी काही नाटकं नाहीत. आता मला मुलाखतीत प्रश्न विचारायला लागले तर ठरवायला लागेल.”

आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’च्या एका स्किटसाठी किती वेळ लागतो? ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या कलाकाराने दिले उत्तर

यानंतर त्याला मग आता तू सिंगलच आहेस का? असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने “मी काही काळाच्या मागे आहे असं अजिबात नाही”, असे सांगितले. त्याबरोबर त्याने गालतल्या गालात हसत प्रतिक्रिया दिली. यावरुन अनेकांनी ओंकार भोजनेची गर्लफ्रेंड असल्याचेही तर्कवितर्क लावले आहेत. मात्र त्याने ती कोण, तिचे नाव काय याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या