'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'च्या सेटवर 'फटके'बाजी, लोक म्हणाले "ओंकार भोजनेला…" | maharashtrachi hasyajatra playing cricket on set video viral people react onkar bhojne comeback nrp 97 | Loksatta

‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या सेटवर ‘फटके’बाजी, लोक म्हणाले “ओंकार भोजनेला…”

अनेकांनी यावर ‘ओंकार भोजनेला परत बोलवा’ अशी कमेंट केली आहे.

‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या सेटवर ‘फटके’बाजी, लोक म्हणाले “ओंकार भोजनेला…”

क्रिकेट हा खेळ प्रत्येकाच्या आवडीचा म्हणून ओळखला जातो. आपल्यातील अनेकजण हे विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळताना दिसतात. फक्त सर्वसामान्य नव्हे तर अनेक कलाकारही क्रिकेटप्रेमी आहेत. नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवर विनोदाचे नव्हे तर क्रिकेटचे फटके पाहायला मिळत आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून त्याला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे क्रिकेटप्रेमी आहेत. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन गोस्वामी हे गोलंदाजी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या कार्यक्रमातील एक सदस्य फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी विरंगुळा असे कॅप्शन दिले आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर ‘ओंकार भोजनेला परत बोलवा’ अशी कमेंट केली आहे. ‘गोस्वामी सर; मामा-मामी, अग्गं अग्गं आई, सोटू पक्कड दे बरं, इ. स्कीटं कधी बघायला मिळतील? ओंकार भोजनेला बोलवा’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरीकडे एकाने ‘ओंकार भोजनेला बोलवा, बरेच स्क्रिप्ट अधुरे वाटतात’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर

दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार भोजने हा कायमच चर्चेत असतो. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही महिन्यांपूर्वी त्याने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे ओंकार भोजनेच्या चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती.अनेकांनी त्याला ट्रोलही केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 17:57 IST
Next Story
“माझी इच्छा नसतानाही मला…” तेजस्विनी लोणारीचं ‘बिग बॉस’बद्दल मोठं विधान