‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपल्या विनोदाच्या अचूक टाइमिंगने ‘हास्यजत्रे’मधील प्रत्येक कलाकाराने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तर हे कलाकार हिंदी चित्रपट, कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. यापैकी एक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप.

पृथ्वीक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी आगामी कामाच्या माहितीसह फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. पृथ्वीकचे सोशल मीडियावरील व्हिडीओ हे सतत चर्चेचा विषय असतात. सध्या त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. लाखो जणांनी पृथ्वीकचा हा व्हिडीओ पाहिला असून शेअर देखील केला आहे. शिवाय या व्हिडीओवर प्रतिक्रियेचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा – अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं लग्नानंतर पत्नीबरोबर देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…

पृथ्वीकने हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पृथ्वीकने जेव्हा ‘तिचा’ सुगंध येतो त्यानंतरची रिअ‍ॅक्शन खूप अप्रतिम दिली आहे. अभिनेत्याच्या याच रिअ‍ॅक्शनची भुरळ सगळ्यांना पडली आहे. अनेक जण पृथ्वीकच्या गोड हास्याचं कौतुक करत आहेत.

अभिनेत्याच्या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा अक्षरशः पाऊस पडला आहे. एका नेटकरीनं लिहिलं आहे, “किती गोड हसलास रे.” तर अभिनेत्री अनघा अतुल, अश्विनी कासार यांनी “बरं” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पृथ्वीकचा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंडची आठवण झाली आहे.

हेही वाचा – Video: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, पृथ्वीकच्या या व्हिडीओला ८५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच ५ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तर २ हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशाच प्रकारे याआधी पृथ्वीकचा प्राजक्ता माळीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पृथ्वीक, प्राजक्ता एकमेकांच्या हातात हात घालून ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर चालताना पाहायला मिळाले होते. दोघांच्या या व्हिडीओमुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

पृथ्वीकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटानंतर अभिनेत्याची दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली आहे. दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहेत. पृथ्वीक प्रतापसह अभिनेत्री सायली संजीव, सुहास शिरसाट पाहायला मिळणार आहेत. दिया मिर्झाची ही शॉर्ट फिल्म काय आहे? कधी प्रदर्शित होणार? आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात समोर येतील.