सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अल्पवधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमाचे आज लाखो चाहते आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. याबाबत या कार्यक्रमातील कलाकारांनीच अनेकदा सांगितलं. कार्यक्रमातील कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. यादरम्यानचाच एक अनुभव प्रसाद खांडेकरने एका मुलाखतीत सांगितला होता. आणखी वाचा - चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले… 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम हा प्रत्येक व्यक्तीला खळखळून हसवण्यास भाग पाडतो. काही प्रेक्षकांचं या कार्यक्रमामवर असणारं प्रेम पाहून कलाकारही भारावून जातात. असाच एक मनाला चटका लावून जाणारा प्रसंग प्रसादने सांगितला होता. तो म्हणाला, "१६ ते १७ वर्षांची एक मुलगी होती. ती मुलगी एका आजारामुळे त्रस्त होती". आणखी वाचा - मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग "तिच्या कुटुंबियांनी मला फोन केला आणि सांगितलं की ती आता काही दिवसच जगणार आहे. डॉक्टरांनीही नातेवाईकांना बोलावून घ्या असं सांगितलं आहे. अशी परिस्थिती असताना त्या मुलीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांशी बोलायचं होतं. तिच्या कुटुंबियांनी आम्हाला व्हिडीओ कॉल केला". आणखी वाचा - शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली… "तेव्हा मी, विशाखा सुभेदार, समीर चौघुले, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे अशी मंडळी व्हिडीओ कॉलवर त्या मुलीशी खूप वेळ बोललो. तिच्याबरोबर खूप गप्पा मारल्या. तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये आम्हा सगळ्यांना बघून ती खूप खूश झाली. तिने ऑक्सिजन वगैरे लावलं होतं. व्हिडीओ कॉल संपला आणि त्याच्या दुसऱ्या क्षणीच आम्ही सगळे ढसाढसा रडलो. लोकांचं प्रेम पाहूनच भारावून गेलो". प्रसादने सांगितलेला हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता.