scorecardresearch

प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मायरा यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पडद्याच्या पाठीमागेही त्यांच्यात छान मैत्री झाली आहे. त्यांचे अनेक ऑफस्क्रीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तेच त्यांचं बॉण्डिंग मालिकेतही दिसून येतं.

आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अशातच मायरा आणि प्रार्थना म्हणजेच मालिकेतल्या परी आणि प्रार्थना सध्या साकारत असलेल्या अनुष्का यांचा एक व्हिडीओ आउट झाला आहे. यात मायरा प्रार्थनाला मिठी मारून रडताना दिसतेय.

आणखी वाचा : Video: ड्रेसचा पट्टा घसरला अन्…अनन्या पांडेची भर कार्यक्रमात फजिती

हेही वाचा : प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा पडली प्रेमात; फोटो पोस्ट करत म्हणाली…

या मालिकेचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत अनुष्का यशच्या घरी फोनवर बोलत असताना अचानक तिथे परी येते आणि तीच तिची आई आहे असं समजून तिला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते असं दिसतंय. त्या दोघींचा हा सीन इतका खरा वाटतोय की त्यांचे चाहतेही कमेंट्स करत त्या दोघींच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. मालिकेचा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 18:14 IST

संबंधित बातम्या