सध्या सगळीकडे गणपती उत्सवाचा जल्लोष सुरु आहे. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांच्या घऱी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे. या मालिकेत काजल काटेने ‘शेफाली’ हे पात्र साकारलं होतं. या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली. काजल काटेच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. मात्र, काजलच्या घरी दोन गणपतीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत काजलने यामागचं कारण सांगितलं आहे.
काजल म्हणाली, “माझ्या चूलत सासरांच्या घरी कोल्हापूरला गौरी गणपती असतात. आमच्या नव्या घरातला हा पहिलाच गणपती उत्सव आहे. माझा नवरा प्रतिकने नवस मागितला होता. जेव्हा माझं स्वत:च घर होईल तेव्हा मी बाप्पा घेऊन येईन असं तो म्हणालेला. आम्ही दोन गणपती बाप्पाच्या मुर्ती बसवल्या आहेत. एक सिद्धीविनायक रुपातली मुर्ती आहे. ही मूर्ती कायमची घरात स्थापन करण्यात येणार आहे. आणि दुसरी छोटी गणपतीची मुर्तीच विसर्जन करणार आहोत.”
हेही वाचा- Video: आई-वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घरीच घडवलं दर्शन! गणपतीच्या देखाव्याने वेधलं लक्ष
काजल ही मूळची नागपूरची आहे. तिने ‘डॉक्टर डॉन’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. “माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ही भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. या भूमिकेमुळे लोक तिला ओळखू लागले.