'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते "माझ्या नवऱ्यानेही..." | maji tuji reshimgath actress swati deval surgery she share photos from hospital see details | Loksatta

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते “माझ्या नवऱ्यानेही…”

अभिनेत्री स्वाती देवलने तिचे रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत.

swati deval actress swati deval
अभिनेत्री स्वाती देवलने तिचे रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत.

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेमध्ये मीनाक्षी वहिनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच स्वाती देवल. मालिकेमधील स्वातीच्या भूमिकेनेही प्रेक्षकांना आपलंस केलं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलची ती स्वाती पत्नी आहे. स्वातीने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Video : बहिणीच्या लग्नाची पत्रिका स्वतः तयार करतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

स्वातीने रुग्णालयामधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिची नुकतीच एक सर्जरी झाली आहे. स्वाती म्हणाली, “कालच माझी एक छोटी सर्जरी झाली. आता मी ओके आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचं प्रेम यामुळेच हे शक्य झालं.”

“स्वामी दत्त कृपा मला वेळोवेळी मिळते. पण विशेष म्हणजे यावर्षी जाणते, अजाणतेपणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळाले. हे ते पुण्य असं कामी येतं. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त एक आठवडा काळजी घ्यायची आहे. बस्स… पण तरीही मी ओके.”

आणखी वाचा – Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…

पुढे स्वातीने तिच्या नवऱ्याचं कौतुक करत म्हटलं की, “नवरा तर सेवेत हजर होता. भाग्य लागतं बरं का असा नवरा मिळायला. पण खरंच तुषारने अगदी पेज बनवून भरवण्यापासून ते पाय दाबून देणेअगदी सगळं केलं. लव्ह यू तुष्की.” तसेच स्वातीने रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्माचाऱ्यांचेही आभार मानले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:50 IST
Next Story
Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय