Bigg Boss 16 : साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, कारण देत म्हणाली… | Mandana Karimi says she does not want to work in Bollywood after Sajid Khan enter in Bigg Boss 16 nrp 97 | Loksatta

Bigg Boss 16 : साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, कारण देत म्हणाली…

त्यातच आता सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने पुन्हा बॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

Bigg Boss 16 : साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, कारण देत म्हणाली…

छोट्या पडद्यावर वादग्रस्त शो पैकी एक अशी ओळख असलेला बिग बॉस हा सध्या चांगला चर्चेत आहे. बिग बॉस हिंदी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच तो वादात सापडला आहे. यामागचे कारण म्हणजे यातील दिग्दर्शक आणि निर्माता साजिद खान. ‘हाऊसफुल’ आणि ‘हे बेबी’ यांसारख्या हिट विनोदी चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून साजिद खानला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. साजिदला बिग बॉसमध्ये पाहताच अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यातच आता सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने पुन्हा बॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

शनिवारी १ ऑक्टोबरला सलमान खान होस्ट करत असलेला रिअलिटी शो ‘बिग बॉस १६’ ची घोषणा झाली. या पर्वात साजिद खानने स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. मी टू मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींकडून साजिद खानवर गंभीर आरोप झाले आहेत. मी टू चे आरोप असलेल्याला स्पर्धक म्हणून बिग बॉसमध्ये संधी कशी दिली, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. साजिद खानवर मी टू मोहिमेतंर्गत आरोप करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मंदाना करिमी.
आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

साजिद खानला बिग बॉसमध्ये बघितल्यानंतर मंदानाने सिनेसृष्टीत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी हमशकल या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. त्यावेळी मला साजिदने कपडे काढण्यासाठी सांगितले होते. मी जे पाहीन ते जर मला आवडलं तर तुला चित्रपटात भूमिका मिळेल, असे त्याने त्यावेळी मला सांगितलं होतं. त्यानंतर आता बिग बॉसमुळे त्याला पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये बघून मला फार मोठा धक्का बसला.”

आणखी वाचा : “मला पक्की खात्री आहे की श्रेया बुगडे…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“फार प्रामाणिकपणे सांगायचे झालं तर त्याला स्पॉटलाइटमध्ये बघून मला आश्चर्य वाटलं नाही. पण एखाद्या गोष्टीतून आपल्याला फायदा मिळत असेल, त्यातून पैसे मिळत असतील तर कोण कशाला पर्वा करेल, असे अनेकांना वाटते. त्यामुळे भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये मी टू मोहिमेनंतर पुढे काहीच होऊ शकलं नाही.”

“पण साजिदला बिग बॉसमध्ये पाहून मला फार वाईट वाटलं. याच कारणामुळे मी गेल्या काही महिन्यांपासून काम करत नाही आणि यापुढे पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणारही नाही. कोणत्याच ऑडिशनसाठी जाणार नाही. कारण जिथे महिलांना आदर दिला जात नाही, अशा बॉलिवूडमध्ये मला परत जायचं नाही. त्या ठिकाणी मला काम देखील करायचं नाही”, असे मंदाना करिमीने म्हटले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षया देवधरची खास पोस्ट, म्हणाली, “तू माझ्या आयुष्यात…”

संबंधित बातम्या

“तुझं असणं मला…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची पहिली पोस्ट
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
“होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच शेअर केला लेकाचा फोटो, नाव ठेवलं…
समंथाचा ‘यशोदा’ लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा
हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिणे ठरू शकते नुकसानकारक; जाणून घ्या याचे दुष्परिणाम
“होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण