Mandar Chadwadkar’s Life Befor TMKOC : मंदार चांदवडकर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून त्याने आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे अनेक जण त्याला भिडे मास्तर म्हणूनही ओळखतात. पण, अनेकांना माहीत नेसल की या मालिकेत काम करण्यापूर्वी त्याने मराठी रंगभूमीवर आणि काही इतर मालिकांमध्ये काम केलं आहे.
मंदार चांदवडकर हा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी परदेशातच राहत होता आणि तिथे नोकरीसुद्धा करत होता. एवढंच काय तर त्याने तिथे रंगभूीचा एक ग्रुपसुद्धा सुरू केला होता. पण अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याने ती नोकरी सोडली आणि भारतात येणाचा निर्णय घेतला त्यानंतर त्याने २००८मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका मिळाली. ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं.
या क्षेत्रात काम करायचा मंदार
मंदार चांदवडकरने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने तो दुबईत कोणती नोकरी करायचा, त्याच शिक्षण किती आहे, तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका त्याला कशी मिळाली या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार मंदार चांदवडकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॅकेनिकल इंजिनीयर होता आणि दुबईत नोकरी करत होता. तर भारतात परत आल्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका मिळेपर्यंत त्याने १३२० ऑडिशन दिल्या होत्या.
अशी मिळाली मालिका
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका कशी मिळाली असं विचराल्यानंतर तो म्हणाला, “सोनालीका जोशीने ऑडिशन दिली होती. तिची निवड झाली होती. त्यामुळे तिला मालिकेत तुझ्या नवऱ्याची भूमिका साकारणारा शिस्तप्रीय मराठी ब्राह्मण असं पात्र आहे त्यासाठी कोणी कलाकार असेल तर सांगा. त्यानंतर तिने पुष्कर श्रोत्रीला विचारलं पण, त्याने नकार दिला, शैलेश दातार यांना विचारल्यानतंर त्यांनीही नकार दिला. मग तिने मला सांगितलं की अशी अशी ऑडिशन आहे बघून घे एकदा.”
मंदार पुढे म्हणाला, “तेव्हा मी इंदौरला होतो. त्यावेळी मी पहिल्यांदा आयुष्यात स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करुन विमानाचं तिकीट काढलं होतं आणि मुंबईला आलो होतो. तेव्हा मी ऑडिशन दिली. मला त्यांनी सांगितलं होतं की तो तत्ववादी माणूस आहे आणि सेक्रटरी आहे तेव्हा मी एकमेव सेक्रटरी असं म्हटलं होतं जे त्यांना खूप आवडलं आणि असित मोदी म्हणालेले की मला माझा भिडे मिळाला.”
