टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. ती सध्या ‘मंगल लक्ष्मी’ या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दीपिका मुंबईतील कडक उन्हात या मालिकेचं शूटिंग करत आहेत. खूप जास्त उन्हात सतत काम करत असल्याने दीपिकाच्या डोळ्यात रक्ताची गुठळी झाली आहे. तिच्या फोटोंमध्ये डोळ्यातील रक्ताची गुठळी स्पष्ट दिसत आहे.

दीपिका शूटिंग करत असातना तिच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली, त्यानंतर तिच्या सहकलाकाराने तिच्या उजव्या डोळ्यात लाल रक्ताची गुठळी झाल्याचं तिला सांगितलं. दीपिका म्हणाली, “अर्ध्या तासात मी डॉक्टरांकडे पोहोचले आणि लगेच औषध घेतले. तसेच डॉक्टरांनी डोळ्यात ड्रॉप टाकले.” तिच्या डोळ्यात झालेली रक्ताची गुठळी बरी होण्यासाठी पाच दिवस लागतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी दीपिकाला डोळ्यांवर ताण न देण्याचा किंवा ग्लिसरीन किंवा इतर उत्पादनांचा वापर न करण्यास डॉक्टरांनी सांगितलं.

Hardik Pandya vs Suryakumar Yadav
Team India : टी-२० कर्णधारपदासाठी सूर्या-हार्दिकमध्ये रस्सीखेच, कोण होणार टीम इंडियाचा ‘कॅप्टन’? पाहा दोघांची आकडेवारी
Who Ended Fight Between Virat Kohli And Gautam Gambhir? Amit Mishra Answers
Amit Mishra : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद कोणी मिटवला? अमित मिश्राने सांगितले ‘त्या’ खेळाडूचे नाव
Shakti Arora
“टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असताना…”; लोकप्रिय मालिकेला निरोप दिल्यावर अभिनेत्यानं केलं मोठं विधान
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
ed to probe actors in forex trading app fraud case
मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंग ॲप फसवणूक प्रकरण ईडीकडून कलाकारांची चौकशी
Riyan Parag Reveals His Ambitions Before Making His Int'l Debut In ZIM
VIDEO : ‘मला हे बदलायचे आहे…’, टीम इंडियातील निवडीनंतर रियान परागचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘लोक अगदी स्विचप्रमाणे…’
what is Lavender marriage
‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय? LGBTQ समुदायाला इच्छा नसताना का करावे लागते लॅव्हेंडर मॅरेज?
Suryakumar Yadav Hilarious Response video
IND v AFG: सूर्यकुमारचं नाव विसरला पत्रकार, वेगळ्याच नावाने हाक मारताच सूर्या म्हणाला; “अरे सिराज भाई तो…”; VIDEO व्हायरल

“मी शुबमन गिलला ओळखत नाही,” लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली अभिनेत्री रिद्धिमा पंडित; म्हणाली, “मला वाटतंय..”

मालिकेचं शूटिंग करताना पाच दिवस डोळ्यांची काळजी घेणं खूप आव्हानात्मक असल्याचं दीपिकाने कबूल केलं. “माझे रडण्याचे खूप सीन आहेत आणि एक कलाकार म्हणून भावना व्यक्त करण्यात डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. उजव्या डोळ्यात गुठळी असल्याने माझे बहुतेक शॉट्स डाव्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे शूटिंगमध्ये अडथळा येत आहे, पण शो सुरू ठेवावाच लागेल,” असं दीपिका म्हणआली.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम करत असूनही दीपिकाला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. उन्हामुळे हे सगळं झाल्याच दीपिका सांगतेय. डोळे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ती पुरेपूर काळजी घेत आहे. डोळ्याला त्रास होऊ नये, यासाठी तिने चहा पिणं सोडलं असून ती नारळ पाणी, ताक आणि इलेक्ट्रोलाइट्सचे सेवन करत आहे. डोळ्यात रक्ताची गुठळी झाली असली तरी आता ती ब्रेक घेऊ शकत नाही, कारण मालिकेत लग्नाच्या एका महत्त्वपूर्ण सीनचं शूटिंग चाललं आहे. त्या सीनमध्ये दीपिकाचं असणं गरजेचं आहे.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

‘मंगल लक्ष्मी’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मंगल आणि लक्ष्मी या दोन बहिणींची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येत आहेत. ज्यात दीपिकाने मोठी बहीण मंगलची भूमिका केली आहे, जी तिची लहान बहीण लक्ष्मीची काळजी घेते आणि तिच्याबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडते. यात लक्ष्मीची भूमिका सानिका अमितने केली आहे.