scorecardresearch

Premium

“स्वच्छ पाणी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर अन्…”, आदेश बांदेकर पर्यावरणपूरक पद्धतीने करतात बाप्पाचे विसर्जन, म्हणाले “ती माती…”

आदेश बांदेकरांच्या कुटुंबियांची गणपती विसर्जनाची हटके पद्धत, पाहा व्हिडीओ

aadesh bandekar
आदेश बांदेकरांच्या कुटुंबियांची गणपती विसर्जनाची हटके पद्धत

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे डोळे पाणावले. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठे कलाकारही बाप्पाला निरोप देताना भावूक झाले. नुकतंच आदेश बांदेकरांनी त्यांच्या घरातील गणपतीच्या विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. गेली कित्येक वर्ष होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आता आदेश बांदेकरांनी त्यांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले “फक्त १३ दिवसांसाठी…”

Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Loksatta explained Why central government imposes export ban on agricultural produce what is the loss to farmers
विश्लेषण: शेतीमालावर निर्यातबंदीची कुऱ्हाड का कोसळते?
government scheme chatura marathi article, government scheme for womans marathi news
शासकीय योजना : स्त्री-उद्योजिकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान
Loksatta kutuhal State of Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवस्था

आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत ते स्वत: माहिती सांगताना दिसत आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरच्या गणपतीची परंपरा १०० वर्षांची आहे. बांदेकर कुटुंबात १०० वर्ष बाप्पा येतात. आदेश बांदेकरांकडे ७ दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात.

यंदाही गणपती बाप्पांचं आगमन बांदेकर कुटुंबियांकडे झाले. गणेशोत्सव साजरा झाला आणि त्यानंतर बाप्पाला निरोप द्यायची वेळ येऊन ठेपते. गणपती बाप्पाची पूजा आपण स्वच्छ मनाने करतो. त्यानुसार बाप्पाचे विसर्जनही स्वच्छ पाण्यात व्हायला हवं. हाच अट्टाहास ठेवून बाप्पाच्या विसर्जनसाठी एक टाकी तयार करण्यात आली आहे.

या टाकीत बांदेकर कुटुंबिय आणि इतर नातेवाईक गुलाबपाणी तसेच स्वच्छ पाणी भरतात. यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत एका बॉक्स स्वरुपातील टाकीत करण्यात आले. यावेळी बाप्पाची मूर्ती ही बंद होण्याआधी पुन्हा वर येते आणि मग आत जाते. याच पाण्यात दरवर्षी बांदेकरांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाते. यानंतर या टाकीतील पाणी त्यांच्याच शेतात झाडांसाठी सोडलं जातं. त्यानंतर माती ही शेतातील मातीत मिसळण्यात येते. या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केल्यामुळे बाप्पा वर्षभर आमच्याबरोबर असतात, असे आदेश बांदेकरांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

या व्हिडीओला कॅप्शन देताना बांदेकर कुटुंबाच्या “गणपती बाप्पांचे विसर्जन…. बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये ना”, असे आदेश बांदेकरांनी म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor aadesh bandekar ganpati visarjan in unique way share video talk about the process nrp

First published on: 04-10-2023 at 18:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×