scorecardresearch

Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

अभिनेता प्रसाद जवादेच्या जागी पाहायला मिळणार आदिश वैद्य

Marathi actor Adish Vaidya entry in Kavyanjali
अभिनेता प्रसाद जवादेच्या जागी आता पाहायला मिळणार आदिश वैद्य

‘कलर्स मराठी’वरील ‘काव्यांजली’ या मालिकेला प्रेक्षकांच्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. अंजली आणि काव्या या दोन बहिणींच्या अतूट नात्याची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. सध्या मालिकेत विश्वजीतने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता काव्या तिचं कसं सौभाग्य वाचवणार हे पाहायला मिळणार आहे. अशातच दुसऱ्या बाजूला नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा – “रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

bhagya dile tu mala marathi serial new twist
रत्नमालाचा नवरा आहे जिवंत, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत होणार ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, पाहा प्रोमो…
Tharla tar mag fame jui gadkari
“मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी असं म्हणाली? जाणून घ्या…
adinath kothare share daughter jija cute video
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ
amruta deshmukh and prasad jawade second kelvan
Video : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केलं प्रसाद-अमृताचं केळवण, अभिनेत्रीचा हटके उखाणा ऐकलात का?

‘काव्यांजली’ या मालिकेत प्रीतमची भूमिका अभिनेता प्रसाद जवादेने साकारली होती. पण आता त्याच्या जागी प्रीतम म्हणून आदिश वैद्यची एन्ट्री झाली आहे. याचा व्हिडीओ आदिशने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहीलं आहे की, “नवीन शो अलर्ट…’काव्यांजली’ मालिकेत प्रीतम भूमिकेत पाहायला मिळणार… नेहमीप्रमाणे तुमच्या प्रेमाची नितांत गरज…गणपती बाप्पा मोरया.”

हेही वाचा – केतकी माटेगावकरचा ‘हा’ हॉलीवूड स्टार आहे क्रश; म्हणाली, “त्याला मराठी अंदाजात प्रपोज करेन…”

दरम्यान, ‘काव्यांजली’ मालिकेत काव्याची भूमिका अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी तर अंजलीच्या भूमिका प्राप्ती रेडकरने साकारली आहे. तसेच पियुष रानडे, सचिन देशपांडे, पूजा पवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा – ‘ढोलकीच्या तालावर’च्या निकालावर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “शुभम बोराडेचं विजेता…”

आदिशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने बऱ्याच हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकांमध्ये तो झळकला होता. शिवाय तो ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor adish vaidya entry in kavyanjali marathi serial pps

First published on: 03-10-2023 at 11:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×