Marathi Actor On Marriage : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपले दैनंदिन अपडेट्स शेअर करीत कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्याशी संवाद साधतात. या संवादात अनेकदा चाहते आवडत्या कलाकारांना वैयक्तिक आयुष्याविषयीही प्रश्न विचारतात.

सोशल मीडियावर अनेक कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून लग्न कधी करणार, सिंगल आहेस का? असे वैयक्तिक आयुष्याविषयीचे प्रश्न हमखास विचारले जातात. असाच एक प्रश्न लोकप्रिय मराठी अभिनेत्याला विचारण्यात आला. हा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत.

अभिनेता अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर अजिंक्य त्याचे अनेक फोटो शेअर करीत असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. सोशल मीडियाद्वारे अजिंक्य कायमच चाहत्यांपर्यंत त्याची कामाविषयीची माहिती शेअर करताना दिसतो.

अशातच नुकताच अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवरील Q&A द्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी अजिंक्यला एका चाहत्यानं लग्नाविषयीचा खास प्रश्न विचारला. चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर अजिंक्यनं नेमकं काय उत्तर दिलं आहे, चला जाणून घेऊ…

“तू रिलेशनशिपमध्ये आहेस का?” अजिंक्य राऊत म्हणाला…

इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये अजिंक्यला चाहत्यानं “तू रिलेशनशिपमध्ये आहेस का? लग्न कर ना… तू खूप चांगला आहेस आणि खऱ्या अर्थानं ‘ग्रीन फ्लॅग’ आहेस.” यावर अजिंक्यनं “मी सध्या सिंगलच आहे” असं उत्तर दिलं. तसेच त्यानं पुढे “पुरुषांना लग्न करताना सुरक्षित वाटेल असा कायदा येईपर्यंत मला लग्न करण्यात अजिबात रस नाही”, असंही स्पष्टपणे सांगितलं.

Ajinkya Raut on his marriage
अजिंक्य राऊत इन्स्टाग्राम स्टोरी

‘बिग बॉस’मध्ये जाणार का? अजिंक्य राऊतने दिलं ‘हे’ उत्तर…

इन्स्टाग्रामवरील या Q&A मध्ये अजिंक्यनं चाहत्यांच्या इतर प्रश्नांचीदेखील मोकळेपणानं उत्तरं दिली. त्याला ‘बिग बॉस मराठी’बद्दलचा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार का, असा एक प्रश्न अजिंक्यला विचारला गेला. त्यावर अजिंक्यनं म्हटलं, “मी ‘बिग बॉस’मध्ये कधीच जाणार नाही. पाहुणा म्हणून कदाचित जाईन; पण स्पर्धक म्हणून नक्कीच जाणार नाही.”

दरम्यान, अजिंक्यनं आजवर लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या ‘विठु माऊली’ व ‘मन उडू उडू झालं’ या मालिका लोकप्रिय होत्या. दोन्ही मालिकांतल्या त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. तसेच तो ‘कन्नी’, ‘टकाटक’ व ‘अभंग तुकाराम’ या सिनेमांत दिसला आहे. लवरकच तो त्याच्या आणखी काही नव्या प्रोजेक्ट्समधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल त्यानं स्वत:च प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये सांगितलं आहे.