छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत कुक्कीची भूमिका अभिनेता अतुल तोडणकर साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत अतुल साकारत असलेली कूक्कीची ही भूमिकाही लोकप्रिय झाली आहे. अतुल हा विनोदी अभिनेता आहे. त्याबरोबर त्याने अनेक सिनेमा, नाटक यामध्ये गंभीर भूमिकाही ताकदीने केल्या आहेत. नुकतंच अतुल तोडणकरने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मच्छिंद्र कांबळी यांची एक आठवण सांगितली आहे.

अभिनेता अतुल तोडणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणी शेअर करताना दिसतो. नुकतंच अतुल तोडणकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मच्छिंद्र कांबळी यांचे जुने फोटो पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना त्याने एक गोड आठवणही सांगितली आहे.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

अतुल तोडणकर यांची पोस्ट

“गोड सुंदर आठवणी.. नाटक : लग्नकर्ता विघ्नहर्ता
बाबूजी मच्छिन्द्र कांबळी बरोबर पहिलं नाटक.. अरविंद औंधे दिग्दर्शक. मस्त भट्टी जुळून आली होती. उत्तम प्रयोग चालू होते. बाबूजीकडून एक एक रिऍशन आत्मसात करण्याचा अभ्यास चालू होता.. इतका सहजसुंदर टाइमिंग.
सहज अभिनय.. मी कम्माल आनंदी..
मच्छिन्द्र कांबळी..एक उत्तम व्यावसायिक विद्यापीठ.
हे नाटक खऱ्या अर्थाने माझ्यासाठी लग्नकर्ता ठरलं.. माझी बायको. माधुरी.. मला याच नाटकाने दिली. आज हे फोटो बघताना सर्व आठवणी ताज्या झाल्या..
ते म्हणतात ना, माणसाने जुने काही विसरू नये, जे तुम्हाला जमिनीवर ठेवते.
मिस यू आणि लव्ह यू बाबूजी”, असे अतुल तोडणकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : हिरवा चुडा, हातभर मेहंदी आणि साजश्रृंगार करत सजल्या पाठकबाई, अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील व्हिडीओ समोर

दरम्यान अतुल तोडणकरची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. कधी कधी आयुष्यातील जुन्या आठवणी मनास आनंद देऊन जातात, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर अनेकांनी यावर हार्ट, स्मायली असे इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.