मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून भाऊ कदम प्रकाश झोतात आला.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
a child girl dance on krishnas bhajan in satsang
VIDEO : चिमुकलीने कृष्णाच्या भजनावर केले नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

भाऊ आता सोशल मीडियावरही सक्रिय झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं. आता तो इन्स्टाग्रामवरही सक्रिय झाला आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भाऊची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. भाऊ या व्हिडीओमध्ये चक्क ढोलकी वाजवताना दिसत आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

पाहा व्हिडीओ

‘मेंदीच्या पानावर…’ हे गाणं भाऊ बोलत आहे. तसेच या गाण्याबरोबरच तो उत्तम ढोलकीही वाजवत आहे. हा व्हिडीओ ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या सेटवरचा असल्याचं दिसत आहे. भाऊला ढोलकी वाजवताना पाहून त्याचे चाहतेही खूश झाले आहेत. त्याच्या या नव्या टॅलेंटला सगळ्यांनीच दाद दिली आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’मधून सागर कारंडेची एक्झिट? ‘त्या’ व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

भाऊ तू कमाल केली, उत्तम ढोलकी वाजवत आहेस, भाऊ मस्तच अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी केल्या आहेत. भाऊच्या या व्हिडीओवरुन त्याला ढोलकी वाजवण्याची आवड असल्याचं दिसून येतं. शिवाय आज भाऊचा वाढदिवस आहे. त्याला चाहते वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत आहेत.