scorecardresearch

“…तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल”, केतकी चितळेने व्यक्त केली भीती; नेमकं काय म्हणाली?

“माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने…” केतकी चितळे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?

ketaki chitale post
केतकी चितळेची पोस्ट चर्चेत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक गोष्टींवर केतकी तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा केतकी वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. सध्या केतकीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केतकीने तिची हत्या होऊ शकते, असं म्हटलं आहे. “मी अजूनही मला न्याय मिळण्यासाठी लढा देत आहे. जामिनावर सुटका झालेली मी एकमेव नाही, तुम्ही नवीन गुन्हे माझ्यावर दाखल केलेत, माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या तरी मी सत्य बोलत राहीन. मी एकतर सत्य बोलण्याने मरेन किंवा नैसर्गिकरित्या गप्प राहिल्याने माझा मृत्यू होईल,” असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> भाजपाच्या वीर सावरकर गौरव यात्रेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या १०२ वर्षीय आजींचा सहभाग, फोटो शेअर करत म्हणाले…

केतकी चितळे पोस्टमध्ये काय म्हणाली?

सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.
एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझ्या मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल.
मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही.
त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल.
जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!

हेही वाचा>> Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

केतकी चितळेची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. केतकीने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:19 IST

संबंधित बातम्या