"तुझं अचानक निघून जाणं अजूनही..." किरण माने यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट | marathi actor kiran mane friend passes aways due to accident he emotional post on social media see details | Loksatta

“तुझं अचानक निघून जाणं अजूनही…” किरण माने यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट

किरण माने यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, सोशल मीडियाद्वारे शेअर केली भावूक पोस्ट

kiran mane post kiran mane
किरण माने यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, सोशल मीडियाद्वारे शेअर केली भावूक पोस्ट

‘बिग बॉस मराठी’चं चौथ्या पर्वाची सर्वाधिक चर्चा रंगली. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस’च्या घरातील इतरही सदस्य सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. त्यातीलच एक सदस्य म्हणजे किरण माने. किरण यांनी उत्तम खेळी खेळत टॉप तीनमध्ये स्थान मिळवलं. आता त्यांच्या चाहतावर्गामध्येही प्रचंड वाढ झाली आहे.

आणखी वाचा – मंडप सजला, नवरी नटली अन्…; वनिता खरातचा नववधू लूक समोर, मराठी कलाकारांची लग्नासाठी हजेरी

किरण सोशल मीडियाद्वारे सतत व्यक्त होतान दिसतात. आताही त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. किरण यांच्या अगदी जवळच्या मित्राचं निधन झालं आहे. कमी वयामध्ये मित्राचं निधन झाल्यानंतर किरण यांनाही धक्का बसला. त्यांनी त्यांच्या मित्राचा फोटोही शेअर केला आहे.

किरण माने म्हणाले, “तुका म्हणे मरण आहे या सकळां…भेणें अवकळा अभयें मोल!” हे सगळं मान्य आहे…तरीही समविचारी मित्राचं असं अकाली, अनपेक्षित, अपघाती जाणं लै लै लै जिव्हारी लागतं! माझ्यापेक्षा लहान होतास मानस…अजून खूप काही करायचं होतं. खूप जगायचं होतं.”

आणखी वाचा – वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

“माझ्या अनेक पोस्टस् वाचून तुझे येणारे कौतुकाचे, चिकीत्सेचे, विश्लेषणाचे मोठ्ठाले फोन्स, लांबलचक मेसेजेस, भरपूर गप्पा.. आणि शेवटी,”नाशिकला आल्यावर घरी या सर” हे सगळं सगळं सगळं खूप मिस करेन. एक दिवस तुला आदरांजली वाहण्याची पोस्ट करावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्यासारख्या विवेकी, संयमी, अभ्यासू मित्राची अशी एक्झिट सहन होत नाही गड्या. लै खचल्यासारखं वाटतंय.” किरण यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:30 IST
Next Story
हळद लागली! वनिता खरात-सुमित लोंढेच्या हळदी समारंभातील फोटो समोर