scorecardresearch

Premium

“माझं एक पेन डाईव्ह हरवलंय…”, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधले लक्ष, म्हणाला “काही फोटो…”

त्याने एक फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे.

kushal badrike
कुशल बद्रिके

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. गेली अनेक वर्ष तो त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. सध्या कुशल त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचा पेनड्राईव्ह हरवल्याबद्दल सांगितले आहे. त्याने एक फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया

Bollywood drama queen rakhi sawant
Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
snehal shidam
“माझ्या वयाची मुलं लग्न करतात आणि मी…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल छिदमच्या पोस्टने वेधलं लक्ष
Amchya Pappani Lai Mala Hanla Video Iphone 15 Lovers Make Parody Full On Marathi Comedy Twist Of Two Friends Viral
“आमच्या पप्पांनी पळू पळू हाणला.. ” या दोन iPhone प्रेमींचा Video बघून म्हणाल “याला बोलतात ट्विस्ट”
prithvik pratap and Priyadarshini Indalkar dance
Video: पृथ्वीक प्रतापचा कात्रजच्या नयनतारासह शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

“माझं सालं एक pen drive हरवलंय काही photos आणि videos असलेलं, तसं रोजचं वापरात नव्हतं म्हणा ते, पण हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय. आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असते बघा अचानक हरवते आणि सापडता सापडत नाही, तसं काहीसं हरवलय “आठवणींनी भरलेलं…” (सुकून)”, असे कुशल बद्रिकेने म्हटले.

आणखी वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले “फक्त १३ दिवसांसाठी…”

दरम्यान कुशलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. “हो साधा रुमाल हरवला तरी आपल्याला किती चुटपुट, पेन draive नवीन घेता येईल पण जुन्या आठवणी त्या कश्या आणणार”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर कुशलने हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor kushal badrike loss his pen drive get upset nrp

First published on: 30-09-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×