अभिनेता आणि हास्यकलाकार कुशल बद्रिके हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सध्या एका चित्रपटाच्या शूटींगसाठी तो लंडनला गेला आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली होती. मात्र एका वेबसाईटने त्याच्याबद्दल चुकीची बातमी दिल्याने त्याने त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

कुशल बद्रिकेने दोन दिवसांपूर्वी लंडनला जात असताना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने एकट्याने परदेशात प्रवास करण्याबद्दल भाष्य केले आहे. त्यात त्याने काही फोटोही शेअर केले होते. या पोस्टनंतर एका वेबसाईटने ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच… अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली एकच खळबळ!’ या हेडींगखाली एक बातमी दिली होती. कुशलने ही बातमी वाचताच त्याबद्दल राग व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “आपल्या वाट्याचे २ पेग प्यायला…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने त्या बातमीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला असून त्या त्याने त्या वेबसाईटला सल्लाही दिला आहे. “कमालीचे बातमीदार… हे असं मांडणारा माणूस रात्री सुखाने झोपू शकतो? देव यांना सदबुद्धी देवो”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

kushal badrike instagram story

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

कुशलच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

“मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, इंटरवल, मधला समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटत, एकटाच असा हॉटेल मद्धे जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही , तसंच एकट्याने प्रवास करायला सुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं, पण आज सिनेमाच्या शूटींगसाठी एकटं लंडनला जावं लागतय. इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वी चा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते. खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार.

पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे , पण तरीही वाटतं…. किमान इंटरनॅशनल प्रवासामधे आपल्या वाट्याचे 2-पेग प्यायला तरी कुणी हवं होतं….हॅप्पी जर्नी टू मी”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली होती.