scorecardresearch

“कशालाच काही अर्थ नाही…” कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

कुशलने शेअर केलेली ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे? याबद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहे.

kushal badrike
कुशल बद्रिके

अभिनेता आणि हास्यकलाकार कुशल बद्रिके हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. नुकतंच कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

कुशल बद्रिके हा ‘चल हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. आज सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मनोरंजन क्षेत्रातील त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्याने त्याच्या या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : “देव यांना सदबुद्धी देवो…” स्वत:बद्दल चुकीची बातमी वाचताच कुशल बद्रिके संतापला

कुशल बद्रिकेची पोस्ट

“कशालाच काही अर्थ नाही” ह्या भावनेची व्याप्ती खूप मोठी आहे , एखादया “black hole” सारखी , सगळं शून्य करुन टाकणारी ! पण “प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ हवा”, ह्या गोष्टीला तरी काय अर्थ आहे ? असे कुशल बद्रिकेने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

कुशलने शेअर केलेली ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे? याबद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहे. त्याबरोबरच त्याने ही पोस्ट नक्की का केली, याबद्दलही चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करतानाही दिसत आहेत. पण, एक कलाकार मनापासून जेव्हा हे म्हणतो.. तेव्हा त्याला नक्कीच काहीतरी ‘अर्थ’ हा असतोच असतो, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

आणखी वाचा : “आपल्या वाट्याचे २ पेग प्यायला…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. यातील ‘दादा परत या ना हसवा ना…’ हे गाणे तुफान हिट ठरले आहे. या गाण्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची आहे. या चित्रपटात भाऊ कदम हे पांडूच्या भूमिकेत तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:07 IST
ताज्या बातम्या